सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – मोबाइलवर गेम खेळत असलेल्या १८ वर्षीय तरूणाच्या मांडीवर टोळक्याने चाकूने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना २९ डिसेंबरला सकाळी अकराच्या सुमारास तळजाई वसाहत पद्मावती परिसरात घडली आहे. याप्रकरणी तिघाजणांविरूद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा तडीपार गुंडांना पकडले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे तळजाई वसाहतीत राहायला असून, २९ डिसेंबरला सकाळी अकराच्या सुमारास मोबाइलवर गेम खेळत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या तिघांनी त्याला शिवीगाळ केली. त्याच्या मांडीवर चाकूने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर टोळके घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी तरूणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस अमलदार निलेश शिवतरे तपास करीत आहेत.




















