वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे जिल्हा परिषदेतील प्रशासन अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या ताब्यात – सविस्तर बातमी 

कमल दत्तात्रय भुजबळ (वय ८२, रा. महात्मा फुलेनगर, माळी मळा, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाहन चालक प्रसन्न प्रकाश अहिरेकर (वय ३५, रा. मोहिते टाऊनशिप, सिंहगड रस्ता ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भुजबळ यांचा नातू हर्षल (वय २०) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल भुजबळ सोमवारी (६ एप्रिल) सकाळी सातच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी माळी मळा परिसरात भरधाव वाहनाने पादचारी भुजबळ यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक बोराटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×