ज्येष्ठ महिला सोनसाखळी चोरट्यांच्या टार्गेटवर

ज्येष्ठ महिला सोनसाखळी चोरट्यांच्या टार्गेटवर

आंबेगाव व विश्रांतवाडी परिसरात घटना

marathinews24.com

पुणे – शहरात सातत्याने दुचाकीस्वार चोरटे ज्येष्ठ महिलांना टार्गेट करत असल्याचे दिसत असून, आंबेगाव तसेच विश्रांतवाडी परिसरात चोरट्यांनी पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन साखळ्या हिसकावल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना मात्र, पोलिसांना हे चोरटे सापडत नसल्याचे वास्तव आहे.

अनैतिक संबंधातून महिलेचा दोरीने गळा आवळून खून – सविस्तर बातमी 

दत्तनगरकडून नर्हेकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात ६५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास पायी चालत जात होत्या. तेव्हा पाठिमागून दुचाकीवरील आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या जवळ येत गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक मोहन कळमकर हे करत आहेत.

दुसरी घटना टिंगरेनगर परिसरातील लेन नंबर पाचमध्ये घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत ७८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार या शनिवारी सातच्या सुमारास जात असताना हॅरीअर सेक्युरिटी सर्व्हिसेस कार्यालयासमोर चोरट्यांनी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक महेश भोसले हे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×