Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सोसायटीतील वीज मीटरला आग; दोन मोटारींसह दुचाकी जळाल्या

सोसायटीतील वीज मीटरला आग; दोन मोटारींसह दुचाकी जळाल्या

वानवडी भागातील घटना

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या आवारातील वीज मीटरला आग लागल्याची घटना वानवडी भागात घडली. आग पसरल्याने सोसायटीच्या आवारात लावलेल्या दोन मोटारी, तसेच दोन दुचाकी जळाल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. सोसायटीतील रहिवाशांनी आवारातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात वस्त्रदालनातून दीड लाखांच्या साड्या चोरी – सविस्तर बातमी 

वानवडी भागातील साळुंके विहार रस्त्यावर मेस्ट्रोज सोसायटी आहे. सोमवारी रात्री सोसायटीच्या आवारातील वीज मीटरच्य खोक्यात आग लागली. काही क्षणात आग पसरली. सोसायटीच्या आवारात लावलेल्या दोन मोटारींसह दुचाकींना आगीची झळ पोहोचली. मोटारींसह दुचाकींनी पेट घेतला. आगीत वाहने जळाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. सोसायटीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट उडाली. रहिवासी तळमजल्यावर आले. सोसायटीच्या आवारातील अग्निशमन यंत्रणा (फायर फायटिंग सिस्टिम) कार्यान्वित करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. जवांनी पाण्याचाा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. वीज मीटरमध्ये शाॅर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×