Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात वस्त्रदालनातून दीड लाखांच्या साड्या चोरी

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

कामगार महिलेविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – शहरातील ओैध परिसरातील एका वस्त्रदालनातून साड्या, तसेच अन्य साहित्य असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका कामगार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालेवाडी भागातील हायस्ट्रीट परिसरात असलेल्या एका सोसायटीतील सदनिकेतून घरकाम करणाऱ्या महिलांनी एक लाख ८० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीश आला. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कामगार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंतवणूकीचे आमिष पडले साडेसात लाखांना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे आशिष रेसीडन्सी सोसायटीत तळमजल्यावर वस्त्रदालन (बुटीक) आहे. या दालनात काम करणाऱ्या महिलेने गेल्या काही महिन्यात साड्या, तसेच अन्य साहित्य चोरून नेले. तक्रारदार महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी शिर्के तपास करत आहेत.

बालेवाडीतील सदनिकेत चोरी

बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील एका सदनिकेत काम करणाऱ्या महिलांनी एका लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला तक्रारदार महिलेकडे घरकामाला होत्या. तक्रारदार महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून शयनगृहातील कपाटातून एक लाख ८० हजारांचे दागिने चोरून नेले. सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×