Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

गुंतवणूकीचे आमिष पडले साडेसात लाखांना

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने सायबर चोरट्याने एकाला तब्बल ७ लाख ८० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १० जून ते १ जुलै २०२५ कालावधीत नांदेड सिटी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय नागरिकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नांदेडसिटी परिसरात राहायला असून, १० जूनला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याची बतावणी केली. ब्रोकरच्यावतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदारांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात केली. अवघ्या १५ दिवसांत तब्बल ७ लाख ८० हजारांची गुंतवणूक केली. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रसाद राउत तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×