येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – येरवडा कारागृहातील बराकीत झालेल्या वादातून कैद्यांनी एकावर फरशीने हल्ला केला. कैद्याच्या डोक्यात फरशी घालून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.विशाल नागनाथ कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जयजवाननगर, येरवडा), दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी काॅलनी, कामशेत) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृह अधिकारी सचिन गुरव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नवीन कात्रज बोगद्यात दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडालिया, रेड्डी, कांबळे हे सराइत आहे. येरवडा भागातील एका खून प्रकरणात चंडालियाला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहातील सी. जे. विभागातील बराक क्रमांक एकमध्ये तिघांना ठेवण्यात आले आहे. चंडालिया, रेड्डी आणि कांबळे यांच्यात कारागृहात वाद झाले होते. सोमवारी (१५ डिसेंबर) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास चंडालिया, रेड्डी यांनी कांबळे याच्यावर फरशीच्या तुकड्याने हल्ला केला. त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा घातला. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. आरडा ओरडा ऐकून कारागृहातील रक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी चंडालिया आणि रेड्डी यांना रोखले. जखमी अवस्थेतील कांबळे याला तातडीने रग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली.

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक जराड तपास करत आहेत. येरवडा कारागृहात यापूर्वी किरकोळ वादातून कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. कैद्यांमधील हाणामारी, चाेरून मोबाइल संच, तसेच अमली पदार्थ आणणे असे गैरप्रकार घडल्याने येरवडा कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर कारागृहातील हाणामारीच्या घटना कमी झाल्या, तसेच गैरप्रकारही कमी झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×