नवीन कात्रज बोगद्यात दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकी घसरून दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. चेतन मधुकर मोरे (वय १७, रा. गणेश चौक, आंबेगाव पठार, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी युवकाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार कृष्णा तानाजी मादगुडे (वय १८, रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी, मूळ रा. तांबाड, ता. भोर, जि. पुणे) जखमी झाला. चेतन मोरेची आई मंगल (वय ३६) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ट्रकच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू – सविस्तर बातमी

भरधाव वेगाने दुचाकी चालवून सहप्रवासी युवकाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार कृष्णा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कृष्णा आणि त्याचा मित्र चेतन हे २७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. नवीन कात्रज बोगद्यात दुचाकी घसरली. अपघातात सहप्रवासी चेतन आणि दुचाकीस्वार कृष्णा यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान चेतन याचा मृत्यू झाला. याबाबत त्याची आई मंगल यांनी नुकतीच पोलिसंकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×