ट्रकच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू

कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१५) सकाळी कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. रमा ललितप्रसाद कापडी (वय ५२, रा. श्रीनिवास संकुल, माऊलीनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक देवेंद्र सत्यम बसान्नापल्ली (वय ४५, रा. नारकडपल्ली, जि. नाळगोंडा, तेलंगणा) याला अटक करण्यात आली. रेवती कापडी (वय २४) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिस्तूलासह काडतुसे बाळगणारा सराईत अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमा कापडी एका शाळेत शिक्षिका होत्या. सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास त्या दुचाकीवरुन शाळेत जात हाेत्या. त्यावेळी कात्रज-कोंढवा रस्त्यावर केसर लाॅजसमोर भरधाव ट्रकने पाठीमागून दुचाकीस्वार कापडी यांना धडक दिली. चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या कापडी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दोन तरुण ठार

शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नगर रस्त्यावर वाघोली परिसरात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार आसिफ याकूब अन्सारी (वय २१, रा. वाघोली, नगर रस्ता) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिराज शेख (वय २८) याने फिर्याद दिली आहे. तर वारजे भागात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ओंकार जगन्नाथ शिंदे (वय २३, रा. भुकूम, ता. मुळशी) याचा मृत्यू झाला. १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत मारुती शिंदे (वय ५०, रा. विठ्ठलवाडी, ता. मुळशी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×