Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

व्याज परताव्यासोबतच उद्योजकता प्रशिक्षण

व्याज परताव्यासोबतच उद्योजकता प्रशिक्षण

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय

marathinews24.com

पुणे – आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने बँक कर्जावरील व्याज परतावा योजना राबविण्यापुरते मर्यादित न राहता, लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले उद्योजकता प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.

कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी – सविस्तर बातमी

याअंतर्गत उद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि. २४ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये “पशुपालन व दुग्ध व्यवसाय” या विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले.

वेबिनारमध्ये दुग्ध व्यवसायासाठी योग्य जातीच्या जनावरांची निवड, संतुलित आहार व्यवस्थापन, आरोग्य काळजी, प्रतिबंधात्मक उपाय योजना, आर्थिक नियोजन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित लाभार्थ्यांनी थेट शंका विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवले.

महामंडळाच्यावतीने राज्यभरातील युवक, महिला उद्योजिका व स्वयं-सहायता गटांसाठी अशा प्रकारच्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमामुळे उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीस चालना मिळणार आहे, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×