बंगाली, कन्नड, तेलगु व गुजराथी माध्यमांच्या उमदेवारांची संख्या कमी असल्याने परीक्षा केंद्रे निश्चित
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलगु व गुजराथी माध्यमांच्या उमदेवारांची संख्या कमी असल्याने परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
भूकरमापक संवर्गातील पद भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
बंगाली माध्यमातून परीक्षा देणाऱ्या मुंबई, पालघर, पुणे, धुळे, नंदूरबार व जालना जिल्ह्यातील उमेदवारांसाठी पुणे तर नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी चंद्रपूर परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. कन्नड माध्यमातून परीक्षा देणाऱ्या मुंबई, ठाणे, नाशिक व धुळे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ठाणे तर पुणे, सोलापूर, हिंगोली, लातूर, धाराशीव जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सोलापूर येथील तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सांगली येथील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
तेलगू माध्यमातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी पुणे येथील तसेच गुजराथी माध्यमाच्या मुंबई, ठाणे, पालघर, पुणे येथील उमेदवारांसाठी ठाणे येथे तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार व बुलढाणा येथील उमेदवारांसाठी नंदूरबार येथील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.




















