Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेत गुणवत्तावाढीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेत गुणवत्तावाढीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

शिक्षण मंत्र्यांची दिवसभर सर्व तज्ञांच्या सत्रांना उपस्थिती

marathinews24.com

पुणे – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेच्या दुपारच्या सत्रात विविध तज्ज्ञांनी नवीन शिक्षण धोरण २०२०, परख सर्वेक्षण अहवाल, प्रशासकीय सुधारणा, समग्र शिक्षण व विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात राबविलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांची माहिती दिली.

जिथे उस तिथे बांधावर नारळ लागवड’ उपक्रमाचा वाणेवाडी येथे शुभारंभ – सविस्तर बातमी 

दुपारच्या पहिल्या सत्रात मा. आनंद पाटील, अतिरिक्त सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी ऑनलाईन व्याख्यान दिले. त्यांनी नवीन शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी, देशभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम व महाराष्ट्राकडून असणाऱ्या अपेक्षा तसेच प्रधानमंत्री पोषण योजनेविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमती इंद्राणी भादुरी, सीईओ अँड हेड ऑफ परख सेल, NCERT, दिल्ली यांनी परख सर्वेक्षण अहवाल, त्यातील महाराष्ट्राची स्थिती व शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

विविध जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादरीकरणे केली. त्यात कोल्हापूरचे कार्तिकेयन एस. साताऱ्याच्या याशनी नागराजन, छत्रपती संभाजीनगरचे अंकित, अहिल्यानगरचे आनंद भंडारी आणि पुण्याचे गजानन पाटील यांचा समावेश होता. सादरीकरणांमध्ये नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी व परिणामकारकता याविषयी माहिती दिली. मंत्री महोदयांनी सर्व सादरीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन सन्मान केला.

शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी इ. ११ वी प्रवेश, समूह शाळा योजना, यू-डायस प्लस, पवित्र शिक्षक भरती मान्यता यांसारख्या प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन केले. राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना व समग्र शिक्षेविषयी माहिती दिली. यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक मा. राहुल रेखावार यांनी NEP २०२० ची अंमलबजावणी, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम, SQAAF, क्षमता आधारीत प्रश्नपेढी, VSK, कृती पुस्तिकांचे विकसन,शैक्षणिक दिनदर्शिका, पीएम श्री शाळा योजना, ई-विद्या वाहिन्या, योग अभ्यासक्रम मार्गदर्शिका आदी उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलने व विद्यार्थी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी २०२६ रोजी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायती आयोजित करण्याचे आवाहन केले. याशिवाय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस रक्कमेत वाढ करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. विशेष बाब म्हणजे मा. मंत्री महोदयांनी शिक्षण परिषदेत दिवसभर पूर्णवेळ उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला व अधिकारी वर्गास मार्गदर्शन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×