Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

जमिनीच्या वादातून लोहगावात साडेसहा लाखांची खंडणी

पुण्यात ठेकेदाराकडे मागितली ३७ लाखांची खंडणी

लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – लोहगाव येथील कलवड वस्ती परिसरात जमीन खरेदीच्या वादातून एका कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन आणि फिर्यादीच्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला खुनाचा थरारक व्हिडिओ दाखवून तब्बल साडेसहा लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमजद उर्फ पप्पू मगदूम (रा. नागपूर चाळ, पुणे) याच्यावर लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुलाम नझलहक मुस्तफा खान (वय ४९, रा. सर्वे नं. २५९, लेन नं. ०२, कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

सतत अपमानित केल्याने हडपसरमध्ये तरुणाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४ पासून आजतागायत ही ब्लॅकमेलिंग आणि खंडणीची मालिका सुरू होती. आरोपी अमजद याने फिर्यादी गुलाम मुस्तफाखान यांच्यावर जमीन घेण्यासाठी आणि इतर कारणांसाठी दबाव आणला होता. आरोपीने फिर्यादीच्या संपूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी दिली होती. तसेच फिर्यादीच्या अवघ्या १५ वर्षांच्या मुलाला मर्डरचा (खुनाचा) थरारक व्हिडिओ दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. भीतीखाली आरोपीने फिर्यादीकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात तब्बल ६ लाख ५० हजार रुपयांची खंडणी उकळली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×