Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

सतत अपमानित केल्याने हडपसरमध्ये तरुणाची आत्महत्या

सतत अपमानित केल्याने हडपसरमध्ये तरुणाची आत्महत्या

मांजरी परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – तरुणाला सतत मानसिक त्रास देणे, धमकावणे आणि वेळोवेळी अपमानित केल्यामुळे तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना ४ जुलैला मांजरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी बारामती येथील व्यक्तीसह इतर नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यात एकाचवेळी ५ सराईतांना तडीपारीचा दणका – सविस्तर बातमी 

धनराज जयवंत पिसाळ असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी सतीश हरिश्चंद्र पिसाल (वय ४३, रा. फोंडावाडा, माळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) व इतर आठ जणांवर मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आशा जयवंत पिसाल (वय ५४, रा. लेन नं. ०३, आनंदनगर सोसायटी, माळवाडी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश पिसाल आणि त्याच्या इतर आठ सहकाऱ्यांनी संगनमत करून फिर्यादी आशा पिसाल यांच्या कुटुंबाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले होते. एवढेच नव्हे तर आरोपी फिर्यादी आणि त्यांच्या मुलांना सातत्याने घरी व सार्वजनिक ठिकाणी येऊन धमकावत होते. वेळोवेळी प्रचंड अपमानित करत होते. सततच्या छळाला व मानसिक छळाला कंटाळून धनराजने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. आरोपींच्या सततच्या दबावाला कंटाळून पुणे-सोलापूर रस्त्यावरील गंधर्व लॉजजवळ त्याने विष प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×