Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

पुण्यात एकाचवेळी ५ सराईतांना तडीपारीचा दणका

पुण्यात एकाचवेळी ५ सराईतांना तडीपारीचा दणका

विविध गंभीर गुन्ह्यांची दखल घेत तडीपार करण्याचे दिले आदेश

marathinews24.c0m

पुणे – रेकॉर्डवरील ५ सराईतांना एकाचवेळी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी दिले आहेत. संबंधित पाचजणांविरूद्ध परिमंडळ दोनच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यातंर्गत जबरी चोरी, हत्यार बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, खूनाचा प्रयत्न, खंडणी घेणे, गुन्ह्याचा कट रचणे, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापार्श्वभूमीवर सराईतांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

हडपसरमधील उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी; ७ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा सुमित भीमराव सितापराव (वय २७, रा. गुजरवाडी, कात्रज) पृथ्वीराज संजय कांबळे (वय २३, रा. संतोषनगर, कात्रज) समर्थ योगेश कुटे (वय २१, रा. शिवांजली दत्तनगर, कात्रज) यांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तर आंबेगाव हद्दीतील अदित्य विनोद नाईक (वय २३, रा. हनुमानगर, जांभुळवाडी) नीलेश दत्तात्रय सातपुते (वय २३ रा. नवीन कात्रज वसाहत) यांनाही पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

परिमंडळ दोनच्या हद्दीतील पोलीस ठाण्यातंर्गत गंभीर गुन्ह्यात ५ सराईतांविरूद्ध तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला होता. त्यानुसार संबंधितांना दोन वर्षांसाठी तडीपारीचे आदेश पारीत केले आहे.

– मिलींद मोहिते, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×