Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

हडपसरमधील उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी; ७ लाखांचे दागिने लंपास

पुण्यातील धनकवडी, आंबेगाव, लोणीकंद भागात घरफोडी

कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाख ३० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविल्याची घटना

marathinews24.com

पुणे – हडपसरमधील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाख ३० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका वकिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसरमधील अमानाेरा पार्क या सोसायटीत राहायला आहेत. ४ जुलै रोजी तक्रारदार हे कुटुंबीयांसह बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी सात लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×