Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या कुटुंबाची काेटयावधीची फसवणुक

अडीच वर्षांनी आराेपीला अटक

marathinews24.com

पुणे – लष्करात वायू दलात विंग कमांडर पदावरुन निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या आजारपणाचा फायदा घेऊन
निवृत्त अधिकाऱ्याचा खासगी चालक व त्याच्या सासऱ्याने संगनमताने कट रचून अधिकाऱ्याच्या मृत्युनंतर एक दिवसातच बनावट कागदपत्रांचा वापर करुन चालकाने तीन वेगवगेळ्या बँक खात्यातून सुमारे ४० लाख रुपये परस्पर काढले. बँक लाॅकर मधून एक काेटी रुपयांचे पारंपारिक साेन्याचे दागिने घेतले आहेत. याप्रकरणी आरोपीला अडीच वर्षांनी अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या कारवाईत ११ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त – सविस्तर बातमी

करण भाऊसाहेब पाटील असे आराेपी चालकाचे नाव आहे. त्याचा सासरा गाेरक्ष ऊर्फ नाना कवडे यांना देखील अटक करण्यात आली आहे. निवृत्त हवाई दलातील अधिकारी विंग कमांडर अरुण कुमार पाल यांच्या कुटुंबाची सदर आराेपींनी आर्थिक फसवणुक केली आहे.

गैरफायदा घेत बनावट मराठी मृत्युपत्र व दस्तावेज तयार करुन फ्लॅट हडपण्याचा देखील प्रयत्न केला. त्याचप्रमाणे संबंधितांची कार देखील स्वत:च्या नावावर करुन घेतल्याचा प्रकार घडला. याप्रकरणात अखेर अडीच वर्षानंतर बावधन पाेलीसांनी आराेपीला अटक केली आहे. आराेपी करण पाटील हा त्यांचा खासगी चालक हाेता. चालकाने फसवणुक केल्याचा प्रकार अरुणकुमार पाल यांचा मुलगा अमिताव पाल यांच्या लक्षात मे २०२३ मध्ये आला. त्यानंतर त्यांनी याबाबत चालकावर फसवणुक आणि विश्वासघाताचा आराेप करत पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल झाल्यावर आराेपी मागील दाेन वर्ष कुटुंबासह फरार झाला हाेता. पाेलीसांनी त्याचा शाेध घेऊन देखील ताे मिळून आला नव्हता. आराेपीने यादरम्यान सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वाच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता. परंतु सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने आराेपीच्या पाेलीस काेठडीची आवश्यकता असल्याचे नमूद करुन जामीन नाकारला हाेता. त्यानंतर सर्वाच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला आवश्यकता असल्यास न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पाेलीस काेठडीची मागणी करण्याचा अधिकार राखून ठेवून अटकपूर्व जामीन मंजूर केला हाेता. पाैड न्यायालयाने आराेपीला अटक करण्यास पाेलीसांना परवानगी दिली.

आराेपीवर भादंवि कलम ३८१, ४०४, ४०६, ४२०, ४६८ आणि ४७१ अंर्तगत गंभीर गुन्हे नाेंदवल्याचे निरीक्षण केले. न्यायालयाने प्राथमिक दृष्टया आराेपी विराेधात ठाेस पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले. यामध्ये काॅल डेटा रेकाॅर्ड, साक्षीदारांचे जबाब आणि आराेपींच्या विधानातील विसंगती याचा समावेश आहे. पाेलीस काेठडी दरम्यान आराेपींची चाैकशीची गरज असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे अखेर याप्रकरणी बावधन पाेलीसांनी आराेपीचा शाेध घेऊन त्याला जेरबंद केले. याबाबत पुढील तपास बावधन पाेलीस ठाण्याच्या सहाय्यक पाेलीस निरीक्षक ज्याेती तांबे करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×