Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

मोदक विक्रीवरून दोन हॉटेलमधील कामगारांमध्ये हाणामारी

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

चिंतामणी गणपती मंदिराजवळील चिंतामणी रेस्टॉरंट मधील घटना

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील थेऊर येथे चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत मोदक विक्रीवरून दोन हॉटेलमधील कामगारांमध्ये वाद निर्माण झाला. या किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले असून, या घटनेत कामगाराच्या डोक्यात लोखंडी खुर्चीच्या पायाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास चिंतामणी रेस्टॉरंटमध्ये घडली. हाणामारीत अर्जुन रामेश्वर पाल (वय २७, रा. चिंतामणी रेस्टॉरंट, थेऊर) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी साहील (वय १९, रा. राधिका हॉटेल, थेऊर) याच्यासह सात ते आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील कात्रज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतामणी गणपती मंदिराजवळील चिंतामणी रेस्टॉरंट हे राज पाल यांचे आहे. तेथे प्रसादासाठी मोदक व पेढे तयार केले जातात. १२ सप्टेंबरच्या दुपारी तीन ग्राहक बाजूच्या राधिका हॉटेलमधून मोदक खरेदी करून आले होते. त्यातील एकाने चिंतामणी रेस्टॉरंटमध्ये मोदक घेताना वजन करून द्यावे अशी मागणी केली. त्यानुसार अर्जुन पाल हा मोदक वजन करत असताना, राधिका हॉटेलमधील कामगार साहील तेथे आला. साहीलने “मोदक वजन करून का देतोस?” असे म्हणत वाद घातला. त्यावेळी अर्जुन पालने “ग्राहकांनी मागितले म्हणून वजन करून दिले, यात गैर काही नाही” असे सांगितले. त्यावर साहीलने शिवीगाळ करून धमकी देत निघून गेला. रात्री आठच्या सुमारास साहील सात ते आठ साथीदारांना घेऊन चिंतामणी रेस्टॉरंटमध्ये आला. त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली. त्यावेळी खुर्चीचा तुटलेला लोखंडी पाय घेऊन साहीलने अर्जुन पालच्या डोक्यात जोरदार प्रहार केला.

साथीदारांनीही स्टीलचे जग, लाथाबुक्क्या व हाताने मारहाण केली. डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने अर्जुन गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी ही धावपळ सोडवली आणि त्याला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. य घटनेमुळे गणपती मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक बिराजदार पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×