ऊरळी देवाची परिसरातील भंगार गोडाउनला भीषण आग
Marathinews24.com
पुणे- ऊरळी देवाची परिसरात आदर्श नगरमध्ये असलेल्या एका भंगार मालाचा साठ्याच्या गोडाऊनमध्ये आग लागली. आगीची माहिती।मिळताच पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंञण मिळवले आहे. घटनास्थळी जवानांनी ३ एलपीजी, तीन ऑक्सिजन सिलेंडर वेळीच बाहेर काढले. गोदामाला आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नसल्याची माहिती जवानांनी दिली.
गुजरातच्या व्यापाराच्या मदतीला धावले पुणे पोलीस – सविस्तर बातमी
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी देवाची परिसरात असलेल्या एका भंगार गोदमाला आग लागल्याची वर्दी सोमवारी दुपारी मिळाली . त्यानुसार दलाने तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याचा मारा केला. वाहनचालक संदिप कर्णे यांनी आगीवर पाण्याचा मारा सुरु असताना गोडाऊनमध्ये प्रवेश करून सिलेंडर असलेला धोकादायक टेम्पो बाहेर काढला. त्यामुळे अनर्थ टळला असून, आगीत कोणीही जखमी झाले नाही.