Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

नाना पेठेतील जुन्या लाकडी वाड्यात आग शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात…

नाना पेठेतील जुन्या लाकडी वाड्यात भीषण आग – शर्थीच्या प्रयत्नांती आटोक्यात

Marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती नाना पेठेत जुन्या लाकडी वाड्याला आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. वाडा बंद असल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र, शेजारी असलेल्या दोन इमारतीतील रहिवाशांना सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. आगीमागचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग दीड तासात आटोक्यात आणली.

नाना पेठेतील राम मंदिराजवळ जुना लाकडी वाडा आहे. या वाड्याचे मालक पारेख नावाची व्यक्ती आहे. गेल्या दहा वर्षांपासून लाकडी वाडा बंद आहे. वाड्यात मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा साचलेला आहे. या वाड्याच्या शेजारी दोन इमारती आहेत, तसेच दुकाने आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास लाकडी वाड्यात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. लाकडी वाड्याला लागलेला आग भडकल्याने अग्निशमन दलाने जादा कुमक मागविली. नाना पेठेतील अरुंद रस्त्यांवर महापाालिकेकडून करण्यात येणाऱ्या कामांमुळे घटनास्थळी त्वरीत मदत पोहोचण्यास अडथळे आले. वाड्याने पेट घेतल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून शेजारी असलेल्या दोन इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढले. आगीची झळ इमारतीला पाेहोचू नये म्हणून पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. रविवासी इमारतीतील सिलिंडर सुरक्षेचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले.

कंपनीला बदनाम करण्याची धमकी देत २० लाखांची खंडणी मागितली – सविस्तर बातमी

अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांसह ८० ते १०० जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन रात्री दहाच्या सुमारास आग आटोक्यात आणली. लाकडी वाडा पूर्णपणे जळाला असून, वाड्याचा काही भाग ढासळला आहे. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अश माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×