Breking News
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरबोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूकनुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ; कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कारलष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेतडीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यूबुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’वाहनांची तोडफोड करणारा गजाआडविवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपाससंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनअर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

बडतर्फ आयएएस पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द

छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. केज तालुक्यातील उंदरी येथील घटना बीड- सासरच्या लोकांनी केलेल्या छळास कंटाळून केज तालुक्यातील उंदरी येथील २५ वर्षीय विवाहितेने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे . घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील आजरखेडा (ता. रेणापूर) येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी अरुणाचा विवाह १६ ऑगस्ट २०१९ रोजी उंदरी (ता. केज) येथील उद्धव ठोंबरे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी उद्धव ठोंबरे बँकेत नोकरी करत होते, मात्र नंतर त्यांनी नोकरी सोडून शेती व्यवसाय सुरू केला. दाम्पत्याला राजनंदिनी (वय ५) तसेच आर्या व अपूर्वा (वय ४) अशा दोन जुळ्या मुलींसह तीन मुली झाल्या. त्या कारणावरून सतत अरुणा हिचा पती उद्धव ठोंबरे दारूच्या नशेत तिला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा आरोप आहे. सासू इंदूबाई ठोंबरे व सासरे उत्तम ठोंबरे हेही 'आम्हाला मुलगा हवा होता, तू आमचा वंश बुडविलास असे म्हणून तिचा अपमान करत मानसिक छळ करीत होते. छळाबाबत अरुणा ठोंबरे हिने व आपल्या आई- वडील, भाऊ गोविंद सूर्यवंशी तसेच मोठी बहीण करुणाला फोनवरून सांगितले होते. सासरच्या त्रासामुळे तिला सासरी नांदण्याची इच्छा नसल्याचे ती वारंवार सांगत होती. मात्र माहेरच्या मंडळींनी तिची समजूत काढून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. अखेर मानसिक छळाला कंटाळून अरुणा ठोंबरे हिने १० जानेवारीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उंदरी येथील राहत्या घरी तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अरुणा ठोंबरे हिचा भाऊ गोविंद सूर्यवंशी यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात उद्धव ठोंबरे, त्याची आई इंदुबाई ठोंबरे आणि उत्तम वडील ठोंबरे यांच्याविरुद्ध गुन्हा बडतर्फ आयएएस पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

marathinews24.com

पुणे – वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडेकरची आई मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. मुळशीतील धडवली गावातील शेतकऱ्याला पिस्तूलाचा धाक दाखवून धमकाविल्याच्या आरोपावरून मनोरमा खेडकर हिच्यासह ७ जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पुणे महापालिका मतदानासाठी १२ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा – सविस्तर बातमी 

शेतकऱ्याला पिस्तूलाच्या धाकाने धमकाविल्याच्या आरोपावरून मनोरमा खेडकरविरुद्ध २०२४ मध्ये पौड पोलिस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे. तसेच नवी मुंबई येथील रबावळे पोलिस ठाणे आणि चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातही विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मनोरमा यांना तुमचा शस्त्र परवाना रद्द का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. अनेकदा नोटीस दिल्यानंतरही त्यांनी खुलासा सादर केला नव्हता. दरम्यान, गेल्या काही दिवसापुर्वी मनोरमा यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन म्हणने मांडले होते.

जीवाला धोका असल्याचे मनोरमा यांनी म्हटले होते. त्यानंतर मनोरमा यांनी खुलासा सादर केला होता. त्यांचा खुलासा पोलिसांना समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला. खेडकर यांनी दिलेल्या जबाबात जीवाला धोका असून, त्याचा जबाबदार पोलिस आयुक्त राहतील. तसेच याबाबत २६ जानेवारीला संचलनाच्या ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आयुक्तालयात आपले म्हणणे सादर करण्यासाठी मनोरमा यांना बोलाविले असता, कॅमेरा आदी साहित्यासह मोठा फौजफाटा घेऊन त्या आयुक्तालयात दाखल झाल्या होत्या.

म्हणून शस्त्र परवाना झाला रद्द

मनोरमा यांनी सादर केलेल्या खुलाशाचे अवलोकन केले असता, तो समाधानकारकर दिसून येत नाही. खेडकर यांचे वर्तन हे गुन्हेगारी वृत्तीचे व कायद्यास न जुमाननारे असून, भविष्यात मंजूर शस्त्राचा गैरवापर केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेत कुटूंबातील व्यक्ती, सर्वसामान्य नागरिकांच्या जिवीतांस धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून परवानाविषयक अटी शर्तीचा भंग करण्याची दाट शक्यता असून, तुम्ही शस्त्र परवाना धारण करण्यास योग्य व्यक्ती नाही. अशी आमची खात्री झाल्याने शस्त्र परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेशात नमूद केले आहे.

औंधच्या बंगल्यात दरोडा, नोकर पसार

मनोरमा खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्यात दोन दिवसापुर्वी मध्यरात्री लुटीचा प्रकार घडला. १५ दिवसांपूर्वी कामाला आलेला नेपाळी स्वयंपाकी आणि साथीदारांनी बंगल्यात जबरी चोरी केल्‍याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. खेडकरच्या आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले. मध्यरात्री एकच्या सुमारास पुजा खेडकर बंगल्यात आली. तेव्हा बेशुद्धावस्थेतील आई वडिलांना तिने पाहिले. नेपाळी कामगाराने खेडकरचे हात पाय चिकटपट्टीने बांधले. त्यानंतर कामगार आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार दागिन्यांची लूट करून पसार झाल्याची प्राथमिक माहती आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी स्वतः तक्रार दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×