Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

अग्निशमन दलाकडून माऊलींच्या पालखीत दलाकडून जवान तैनात

आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतीकरिता अग्निशमन दलाकडून जवान तैनात

marathinews24.com

पुणे – आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यनगरीत आगमन होत असते. यावेळी लाखोच्या संख्येत वारकरी संप्रदाय सहभागी होत असतो. या अनुषंगाने पालखी सोहळ्यामध्ये आग वा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतीकरिता अग्निशमन दलाकडून दरवर्षी अग्निशमन वाहन पुणे ते पंढरपूर तैनात करण्यात येते.

राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन – सविस्तर बातमी

यावर्षी देखील पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून एक अग्निशमन वाहन एक अधिकारी व सहा जवानांसह पथक काल आळंदीमध्ये दाखल होत पुढे पंढरपूर पर्यंत तैनात राहणार आहे. तसेच पुण्यनगरीत पालखीच्या आगमनावेळी विश्रांतवाडी चौक येथे येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन तर संगम पुलानजीक दिवंगत दयाराम राजगुरु अग्निशमन केंद्रातील वाहन पुढे खंडोजीबाबा चौक रस्त्यावर एरंडवणा अग्निशमन केंद्रातील वाहन आणि भवानी – नाना पेठ येथे अग्निशमन मुख्यालयातील वाहन बंदोबस्तकरिता राहणार असून पालखी पुढे मार्गस्थ होताना हडपसर अग्निशमन केंद्रातील वाहन गाडीतळ येथे दाखल असणार आहे.

पुणे ते पंढरपूर मार्गस्थ पालखीत आग वा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे 8208956316, फायर इंजिन ड्रायव्हर राजू शेलार 9922426600, फायरमन अजितकुमार शिंदे 8805988039 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

“पालखीत वारकरी भाविकांसाठी आमचे अग्निशमन दल नेहमीच सज्ज असते. या गणवेशधारी सेवेमध्ये कर्तव्य बजावत असताना बंदोबस्त करीत माऊलींची सेवा करीत वारी पुर्ण करण्याचे वेगळेच समाधान मिळते.”

कैलास तुकाराम शिंदे
प्रभारी अग्निशमन अधिकारी
अग्निशमन दल, पुणे मनपा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×