फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील कसबा पेठ परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडत सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अवघ्या अडीच तासात चोरट्यांनी ही घरफोडी केली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पुण्यात सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कसबा पेठेतील पवळे चौक येथील इमारतीत राहतात. दरम्यान, ते रात्री साडे आठच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेस केला. ६ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात दागिने, रोकड असा ऐवज चोरीस गेला आहे. तक्रार हे रात्री अकराच्या सुमारास घरी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
सोलापूर महामार्गावरील रविदर्शन येथे थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील १ लाखांचे मंगळसूत्र चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात ४७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. तक्रारदार मांजरीत राहण्यास असून, त्या रवीदर्शन येथे उभा होत्या. पाठिमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत गळ्यातील सोन साखळी हिसकावली. अधिक तपास पोलिस करत आहेत.
























