Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पुण्यात व्याजाच्या पैशासाठी फ्लॅटवर मारला ताबा

सराईताकडून पिस्तूलसह दोन काडतुसे जप्त

बेकायदेशीर सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – व्याजाचे पैसे वेळेवर देऊनही आणखी ८ लाख रुपयांची मागणी करत, रक्कम न दिल्याने थेट फ्लॅटवर ताबा मारणाऱ्या सावकारासह महिलेविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशाल लंकेश्वर (रा. वारजे, पुणे) आणि मधुमती रंगदाळे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सम्राट सुधीर सुपेकर (वय ३६, रा. तिरुपतीनगर, वारजे, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी सुरभी हाइट्सच्या ए विंगमधील फ्लॅट क्रमांक सात येथे घडला.

स्वतः फसले अन साडू, मेव्हणीलाही अडकवले – सविस्तर बातमी

तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुनील जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सम्राट सुपेकर यांचे नळ स्टॉप परिसरात ‘सूर्या स्नॅक्स’ नावाचे हॉटेल आहे. तसेच सुरभी हाइट्स, वारजे येथील ए विंगमधील फ्लॅट क्रमांक 7 त्यांनी २०१७ मध्ये खरेदी केला होता. २०१८ ते २०२४ या कालावधीत त्यांनी कर्वेनगर येथे ‘पुरंदरे स्नॅक्स अ‍ॅण्ड भोजनालय’ नावाचा हॉटेल व्यवसायही चालविला. हॉटेल व्यवसायाचा विस्तार करायचा असल्याने सुपेकर यांना पैशांची गरज होती. त्यांची ओळख विशाल लंकेश्वर आणि मधुमती रंगदाळे यांच्याशी झाली.

आम्ही व्याजाने पैसे देतो, हा आमचा व्यवसाय आहे, असे सांगत त्यांनी ‘डेली कलेक्शन’ पद्धतीने पैसे देण्याचे आश्वासन दिले. ऑक्टोबर २०२२ मध्ये लंकेश्वर याने ९ हजार रुपये दिले. यासाठी रोज २५० रुपये व्याज कलेक्शन ठरवले होते. ही रक्कम मधुमती रंगदाळे यांच्या नावाने असलेल्या बेअरर चेकद्वारे देण्यात आली. पुढील ५० दिवसांत सुपेकर यांनी व्याजासह १२ हजार ५०० रुपये लंकेश्वर यांना परत केले.

पुन्हा पैशांची गरज भासल्याने सुपेकर यांनी लंकेश्वरकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. डिसेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२५ या २० महिन्यांच्या कालावधीत लंकेश्वरच्या सांगण्यावरून सुपेकर यांनी सहकारी मधुमती रंगदाळे हिच्या मोबाईलवर ऑनलाईन स्वरूपात एकूण ४ लाख ८० हजार रुपये व्याजासह परत केले. तरीही फेब्रुवारी २०२५ मध्ये लंकेश्वर याने पुन्हा १ लाख रुपयांची मागणी केली. सर्व रक्कम दिल्याचे सुपेकर यांनी सांगितले असता, उर्वरित रक्कम न दिल्यास “तुला पाहून घेतो” अशी धमकी दिली.

१७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुपेकर हे पत्नीसमवेत सुरभी हाइट्समधील त्यांच्या फ्लॅटची साफसफाई करण्यासाठी गेले असता सायंकाळी लंकेश्वर आणि रंगदाळे तेथे आले. व्याजाचे पैसे मागत त्यांनी शिवीगाळ केली. पैसे न दिल्याने त्यांनी थेट फ्लॅटचा ताबा घेत सुपेकर दाम्पत्याला बाहेर काढले. “व्याजाचे पैसे मिळेपर्यंत फ्लॅट आमच्या ताब्यात राहील,” असे सांगत त्यांनी बेकायदेशीररित्या ताबा मिळविला. यानंतर एप्रिल २०२५ मध्ये सुपेकर यांनी तो फ्लॅट अजय घुले यांना सह दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत विक्री करून त्यांच्या नावावर केला. मात्र, चावी घेण्यासाठी सुपेकर लंकेश्वर आणि रंगदाळे यांच्याकडे गेले असता त्यांनी पुन्हा मुद्दल व व्याजाची मागणी केली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीर सावकारी करत व्याजाच्या पैशातून फिर्यादींच्या सदनिकेवर ताबा मारण्यात आल्याने संबंधितांविरुद्ध सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. – सुनील जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक, वारजे माळवाडी पोलिस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×