‘बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए’ म्हणत ‘ठाण्याची रिक्षा सुसाट’चे पुण्यात झळकले फलक
Marathinews24.com
पुणे – काही दिवसापूर्वी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामर याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक गाण सादर केल होत.यावरून मोठ्या प्रमाणावर वाद पाहण्यास मिळाला होता.त्याच दरम्यान पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ यांनी टिळक रोडवर रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे आणि मागे बसलेला ‘कॉमन मॅन’ आणि ‘बोलनेवाले बोलते रहें, वो काम ही करता जाए !’ या आशयाचे मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे.तर हा फ्लेक्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी’ गाण्यांच्या ओळी लिहीत ‘शेर नजर वो आए’ असा उल्लेख एकनाथ शिंदे यांचा करण्यात आला.तर हिंदुत्वाचा कैवारी, चिपळूणचा महापूर, इर्शाळवाडीची दुर्घटना यामध्ये शिंदे यांनी तत्परता दाखवत थेट घटनास्थळी जाऊन केलेले कार्य, आरोग्य कक्षाच्या माध्यमातून केलेले कार्य यासह लाडकी बहीण योजना या काव्यातून मांडली आहे. काश्मीरच्या लाल चौकातील गणेशोत्सवात त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग यातून त्यांची कीर्ती ठाणेच नव्हे, तर पूर्ण देशभर असल्याचे दिसून येते,असे ही यातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या फ्लेक्सबाजी बाबत वैभव वाघ म्हणाले,एकनाथ शिंदे यांनी अवघ्या अडीच वर्षात मुख्यमंत्री केलेले लोकोपयोगी कार्य प्रेरणादायी आहे.सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधीक चांगल्या सोयीसुविधा, योजना देण्याचे काम त्यांनी केले.लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून लाखो गोरगरिबांना सेवा दिली. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, हिंदुत्वासाठी चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांबाबत कुणाल कामराने बदनामीकारक वक्तव्य संतापजनक आहे.कोणतेही कार्य न करणाऱ्या माणसाने शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्यांचा कैवारी असलेल्या व्यक्तीवर अवमानजनक काव्य रचणे ही विकृती आहे.कलेच्या नावाखाली अशी विकृती आपण सहन करता कामा नये.सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा गौरव आणि सन्मान करणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.