कोंढाव्यात भरदिवसा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाचा खून
marathinews24.com
पुणे – शहरात टोळीयुद्धाचा फुन्हा भडका उडाला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याच्या भावावर पिस्तूलातून गोळ्या झाडून भरदिवसा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.१ ) दुपारी कोंढवा भागात घडली आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीनासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
‘झेप’ बंगल्याची संरक्षित भिंत पुन्हा बांधली – सविस्तर बातमी
अमन मेहबूब शेख वय २३, रा काकडे वस्ती कोंढवा) आणि अरबाज अहमद पटेल वय २५, रा काकडे वस्ती, कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश किसन काळे (वय ३२, रा. येवलेवाडी, कोढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. गणेश काळे हा रिक्षाचालक आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणात समीर काळे याला अटक करण्यात आली हाेती. आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिल्याप्रकरणी समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांना अटक करण्यात आली होती. काळे हा शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोंढव्यातील खडी मशीन चौकात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ थांबला होता. त्यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केला, तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. हल्लेखोर भरधाव वेगातन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. प्राथमिक तपासात काळे याचा खून टोळीयुद्धातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक वनराज आांदेकर याचा १ सप्टेंबर रोजी २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम चौकात पिस्तुलातून गोळीबार करुन खून करण्यात आला. नाना पेठेतील वर्चस्व, तसेच कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून आंदेकर याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते, वनराज आंदेकरची बहीण संजीवनी, मेहुणे जयंत, गणेश यांच्यासह १६ आरोपींना अट केली होती. याप्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती.
वनराज आंदेकरच्या खूनाचा बदला घेण्यासाठी गणेशोत्सव विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ६ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह आरोपींना अटक करण्यात आली होती.
दोन दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी गणेश काळे याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार केले. आरोपींनी त्याच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्याची शक्यता आहे. पोलिसांना घटनास्थळी एक दुचाकी सापडली आहे. पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर खूनामागचे निश्चित कारण समजेल. – डाॅ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ पाच



















