Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

आतेभावाकडून तरुणाचा खून

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून आतेभावाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी मार्वेâटयार्ड पोलिसांनी आतेभावाला अटक केली. रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कौशल लांडगे (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेला साथीदार अंश पटेल (वय १८) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत रोहन ओव्हाळच्या बहिणीने फिर्याद दिली आहे.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ३७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन ओव्हाळ हा बेरोजगार होता. कौशल लांडगे त्याचा आतेभाऊ आहे.दोघात काही दिवसांपुर्वी भांडणे झाले होते. त्याच रागातून सोमवारी पहाटेच्या सुमारास आरोपी कौशल आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने रोहनला गाठले. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील अश्विनी पॅरेडाईज सोसायटीजव त्याला शिवीगाळ करुन पट्टयाने मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू मारला. रोहन गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. या घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या कौशलला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×