Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

शेअर ट्रेडींगसह फॉरेक्स ट्रेडींगचे आमिष दाखवून घातला गंडा

मेट्रो प्रवासी महिलेशी अश्लिल वर्तन, ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा

दोन घटनेत ६९ लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगसह फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमुळे लुटीचा आकडा वाढत चालला असून, नागरिकांकडून सायबर चोरट्यांचा अटकाव करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक सायबर चोरट्यांच्या जाळयात अडकत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुण्यात मोक्क्यातील फरार आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी धायरीतील तरूणाला तब्बल ३३ लाख ४६ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ४ जून ते २२ जुलै कालावधीत धायरीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराला सायबर चोरट्याने जादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादित करून अवघ्या दीड महिन्यांत ३३ लाखांवर रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. वरिश्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करीत आहेत.

फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठाला तब्बल ३५ लाख १५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना ८ जून ते २९ जुलै कालावधीत धायरीत घडली असून, याप्रकरणी ६६ वर्षीय नागरिकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार जेष्ठ नागरिक धायरीत राहायला असून, सायबर चोरट्यांनी त्यांना ८ जूनला संपर्क केला. फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादित करून रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. अवघ्या दीड महिन्यांत ३५ लाख रूपयांहून अधिक रक्कम वर्ग करूनही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेष्ठाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करीत आहेत.

मनी लॉड्रिंगच्या केसची धमकी, २७ लाखांचा गंडा

पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने एकाला मनी लॉड्रिंगच्या केसमध्ये अटक करण्याची धमकी दिली. होम अरेस्ट टाळण्यासाठी रक्कम पाठविण्यास भाग पाडून तब्बल २७ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना २८ जुलै ते ६ ऑगस्ट कालावधीत कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी ५६ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढव्यात राहायला असून, २८ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून पोलीस असल्याची बतावणी केली. मनी लॉड्रिंगच्या केसमध्ये अटक करण्याची धमकी देउन त्यांना धमकावले. होम अरेस्ट टाळण्यासाठी सायबर चोरट्याने तक्रारदाराला रक्कम पाठविण्यास सांगितले. त्यामुळे बदनामी आणि अटकेपासून बचाव करण्यासाठी तक्रारदाराने संबंधिताच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यास सुरूवात केली. तब्बल २७ लाख रूपये पाठविल्यानंतरही त्यांच्याकडे रक्कम पाठविण्याची मागणी करण्यात आली. संशय आल्यामुळे त्यांनी इतरांकडे विचारपूस केली असता, फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×