Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

बारामतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबीराचे आयोजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन

marathinews24.com

बारामती – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथे ४ जून आणि ७,८ व १६ जुलै २०२५ रोजी मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन – सविस्तर बातमी

पुणे येथील वॉक फाऊंडेशन आणि बायोरॅड मेडिसिस या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात मोफत तपासणी करण्यासोबतच रुग्णांवर कोणताही खर्च न करता संपूर्ण उपचार करण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील अनुभवी आणि गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत पारंगत सर्जन्सद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुडघ्याचे सांधे आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि यशस्वीपणे करण्याचे नियोजन आहे. पुणे जिल्ह्यासोबतच बाहेरील रुग्णांसाठीही ही सुविधा उपलब्ध आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन आणि एक वर्ष नियमित चाचणी सुविधा मिळणार आहे.

या शिबीरात विशेषतः संधिवातामुळे त्रस्त ज्येष्ठ नागरिक, चालताना तीव्र वेदना किंवा चालणे अशक्य झालेल्या रुग्णसोबतच आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नसलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. या शिबीरात सहभागी होण्याकरीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे लवकरात लवकर नोंदणी करुन या संधीचा लाभ घ्यावा, आपल्या जवळच्या नातेवाईंकांनाही या शिबिराबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×