पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक

गुन्हे शाखेच्या युनिट चारची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघांना मोक्काच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने जेरबंद केले. संतोष सुरेश भालेराव (वय २१, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) आणि आकाश ऊर्फ अक्की संतोष देवकर (वय २०, रा. बोऱ्हाडे वस्ती, मोशी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

सोलापूर रस्त्यावर पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असताना अंमलदार अजय गायकवाड व वैभव रणपिसे यांना माहिती मिळाली की, संतोष भालेराव हा आकुर्डी येथील खंडोबामाळ चौक परिसरात येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो मोक्काच्या गुन्ह्यात फरार असल्याचे उघड झाले.

दरम्यान दुसऱ्या कारवाईत अंमलदार विशाल इथापे व नागेशसिंग कुंवर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आकाश ऊर्फ अक्की देवकर हा आंबेडकर चौक परिसरात येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यालाही जेरबंद केले. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या कारवाईत उपनिरीक्षक वैभव मगदुम तसेच अंमलदार प्रवीण राजपूत, प्रवीण भालचिम, सुभाष आव्हाड, विदल वाव्हळ, जहांगिर पठाण, अमजद शेख यांनी सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×