रेल्वेतून उतरताना केला मदतीचा बहाणा; ४० लाखांचे दागिने चोरणार्‍या टोळीला अटक

रेल्वेतून उतरताना केला मदतीचा बहाणा; ४० लाखांचे दागिने चोरणार्‍या टोळीला अटक

लोहमार्ग पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

marathinews24.com

पुणे – रेल्वेतून प्रवाशांना बॅगा खाली उतरवण्यास मदत करतो, अशी बतावणी करीत हातचलाखीने तब्बल ४० लाखांचे सोने-हिरेजडीत दागिने चोरणार्‍या आंतरराज्यीय टोळीला पुणे रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील बहुतांश २८८ ग्रॅम किंमतीचे दागिने जप्त केले आहेत. कुलदीप रामफळ (वय २८) अमितकुमार बलवानसिंग (वय ३१) अजय सतीशकुमार (वय २८) मोनू राजकुमार (वय २५ ) हवासिंग फतेहसिंग (वय ६६ सर्व रा. हरियाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुण्यातील राजगुरूनगरमध्ये विद्यार्थ्यांचा गळा चिरला – सविस्तर बातमी 

तक्रारदार महिला २६ नोव्हेंबरला कुटूंबियासह बेंगलोर एक्सप्रेसने सुरत ते मिरज असा रेल्वेप्रवास करीत होत्या. रेल्वे गाडी मिरज रेल्वे यार्डातून हळुवारपणे धावत असताना, तिघीजणी त्यांच्या बॅगा बोगीच्या दरवाज्याजवळ घेउन जात होत्या. त्यावेळी ५ जणांनी त्यांना बॅगा उतरवण्यास मदत करतो, अशी बतावणी केली. मदतीच्या बहाण्याने महिलांची नजर चुकवून चोरट्यांनी बॅगेतील सोन्याचे, डायमंडचे मिळून २४ तोळे चोरून नेले. याप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपासादरम्यान संबंधित आरोपी हरियाणातील असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी हे विमानाने दिल्ली येथे गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

रेल्वे पोलिसांनी तातडीने दिल्ली विमानतळ अ‍ॅथोरेटी व दिल्ली गुन्हे शाखेच्या मदतीने पाचही आरोपींना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना ९ दिवस पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, प्रभारी अधिकारी बाळासाहेब अंतरकर, प्रभारी अधिकारी सुभाष मुंढे, एपीआय प्रभाकर कापुरे, एपीआय रूपाली गोरड, उपनिरीक्षक सुनिल माने, उपनिरीक्षक धंनजय चव्हाण, उपनिरीक्षक आर.बी. पाटील, उपनिरीक्षक डी.एस लाड, विशाल मोरे, आण्णासाहेब पारखे, दिपक ठोंबरे, मोसीन पटेल, तैफिक पटेल, अमर सावंत, इब्राहिम अरभावी, पंकज आवळे, संतोष जगताप, अमित गवारी, अंन्सार मुजावर, युवराज गायकवाड यांनी केली.

अनोखळी प्रवाशांची मदत घेउ नका

रेल्वे स्टेशन जवळ आल्यानंतर प्रवाशी दरवाजाजवळ येउन थांबतात. त्याचवेळी सावज हेरण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याकडून बॅग उचलून देण्याचा बहाणा केला जातो. त्यानंतर प्रवाशांची नजर चुकवून त्यांच्या बॅगेतून किमती ऐवज चोरून नेला जात असल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेप्रवासात नागरिकांनी अनोखळी व्यक्तीवर विश्वास ठेउ नका. त्यांच्या मदतीला भुलू नका असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

रेल्वेतून उतरताना चोरट्यांनी महिलांना मदतीच्या बहाण्याने बॅगेतून सोन्यासह हिरेजडीत दागिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी संबंधितांना अटक करीत ऐवज जप्त केला आहे. पथकाने त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. – रोहिदास पवार, अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×