Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

टोळक्याकडून मारहाण, औंध परिसरातील घटना

टोळक्याकडून मारहाण, औंध परिसरातील घटना

चतु:शृंगी पोलिसंनी टाेळक्याविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – नाचताना धक्का लागल्याच्या कारणातून झालेल्या वादातून टोळक्याने चौघांना मारहाण केली. ही घटना ओैंधमधील इंदिरा गांधी वसाहतीत घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसंनी टाेळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कुणाल नंदकिशोर तुजारे (वय २२, रा. श्री हनुमान मंदिराजवळ, इंदिरा गांधी वसाहत, ओैंध) याने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमोद घडसिंग, समीर घडसिंग, भैय्या सरोदे, तेजस देवकर, ओमकार पाटोळे (सर्व रा. इंदिरा गांधी वसाहत, ओैंध) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम करण्यास दिरंगाई – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल तुजारे याचे वडील बुधवारी (१ एप्रिल) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इंदिरा गांधी वसाहतीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात नाचत होते. साऊंडवर गीते लावण्यात आली होती. त्या वेळी नाचताना आरोपी प्रमोद घडसिंग याला कुणालच्या वडिलांचा धक्का लागला . त्या कारणातून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी कुणालचे वडील नंदकिशोर यांना मारहाण केली. कुणाल आणि त्याचा पुतण्या आरोपींना जाब विचारण्यास गेले. तेव्हा टोळक्याने त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×