Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यातील धनकवडीत टोळक्याचा राडा, १२ रिक्षासह वाहनांची तोडफोड

सहकार नगरच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीला सलामी

marathinews24.com

पुणे – दहशत माजविण्याच्या उद्देशाने त्रिकुटाने स्टम्पसह दगडाने तब्बल १२ रिक्षासह इतर वाहनांची तोडफोड केल्याची घटना २३ जुलैला मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास धनकवडीत घडली आहे. त्यामुळे ही तोडफोड फक्त सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनाची नसून, पोलीस आयुक्तालय, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबीनची असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. वाहन तोडफोडीच्या घटनेनंतर रात्रगस्त, गुन्हे शाखा, बीट मार्शलांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

राज्य उत्पादन शुल्क पथकाची पुरंदर तालुक्यात छापेमारी – सविस्तर बातमी

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडीत तिघा जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. बुधवारी रात्री पावणेएकच्या सुमारास धनकवडी परिसरात केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, नवनाथ नगरात अशा तीन तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोडीत १२ रिक्षा, दोन कार, टेम्पोच्या काचा फोडल्या आहेत. स्टम्प आणि दगडाने काचा फोडल्यानंतर पळून जाताना टोळक्याने दोन नागरिकांना मारहाण करून जखमी केले आहे. वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे रिक्षा चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. दोनच दिवसांपुर्वी सहकारनगर ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नूतन अधिकार्‍यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर टोळक्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीला गुन्हेगारांनी सलामी दिल्याचे बोलले जात आहे.

*टोळके पसार, सीसीटीव्हीनुसार तपास सुरू*

पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीनंतर टोळक्याचा धुडगूस सुरू होतो. सर्वसामान्यांची वाहने तोडून नुकसान केले जाते. वाढदिवस साजरा करताना धांगडधिंगा घातला जातो. रात्री-अपरात्री बुलटेच्या सायलेंन्सरमधून फटाके फोडल्याचा आवाज काढला जात आहे. मात्र, अशा घटनेनंतरही स्थानिक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे फावले असून, त्यांच्यातील धाडस वाढत चालले आहे. धनकवडीत वाहनांच्या तोडफोडीनंतर टोळके पसार झाले असून, त्यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहे.

*म्हणून कायद्याची भीती आवश्यक*

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा वारंवार प्रश्न निर्माण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची नुकतीच बदली केली आहे. मात्र, अधिकार्‍यांच्या बदलीऐवजी गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे आवश्यक आहे. गंभीर घटना टाळण्यासाठी बीट मार्शल पेट्रोलिंग, खबर्‍यांचे नेटवर्क, गुन्हे शाखेची पथके अलर्ट असणे आवश्यक आहे.

टोळक्याने धनकवडी परिसरात वाहनांची स्टम्पसह दगडाने तोडफोड केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची छबी कैद झाली असून, त्यांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना केली आहेत.

राहुल आवारे, सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×