Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

सराफ व्यावसायिकांची फसवणुक करणारी टोळी जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट सहाने केला पर्दाफाश

marathinews24.com

पुणे – बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून सराफ व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट सहाने पर्दाफाश केला आहे. तिघांना अटक करून त्यांच्याकडून ८ लाखांचा मुद्देमाल जत्त केला आहे. रोहित संजय गोरे (वय३० रा. ओम अपार्टमेंट, मोहन नगर, धनकवडी), अजय दत्तात्रय पवार ( वय २८, रा. गोगावले बिल्डिंग, म्हसोबा मंदिर जवळ, वडगाव बुद्रुक), ओम सुंदर खरात, वय २३, रा. गोगावले बिल्डिंग, म्हसोबा मंदिर जवळ, वडगाव बुद्रुक) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत.

मेफेड्रॉनची तस्करी करणार्‍या राजस्थानीला अटक, २५ ग्रॅम एमडी जप्त – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे हे १८ ऑगस्टला हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मुंढे यांना बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून सराफ दुकानदारांची आर्थिक फसवणूक करणारे खांदवेनगर व वाघोली परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी गोरे, पवार व खरात तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी चंदननगर, कळेपडळ, पर्वती व आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे कबुल केले.

पोलिसांनी आरोपींकडुन रोख तीन लाख, एक लाख रुपये किंमतीचे मोबाईल, ४ लाख रुपये किंमतीचे हॉल मार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने, असा एकुण ८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असुन, पुढील कारवाईसाठी आरोपींना चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलिस निरीक्षक वाहीद पठाण, एपीआय राकेश कदम, मदन कांबळे, सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, निर्णय लांडे, सुहास तांबेकर, सचिन पवार, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×