एरंडवणेतील उपाहारगृहातून रोकड लुटणारे गजाआड

गुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत अटकेत, पिस्तूल जप्त

डेक्कन पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील एरंडवणे भागातील रेस्टाॅरंट आणि बारमधील रोकड लुटणाऱ्या चौघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. आरोपींबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. अजिंक्य रवींद्र ओव्हाळ (वय २१, रा. नऱ्हे), प्रचीत लक्ष्मण काकडे (वय २४, रा. एरंडवणे गावठाण), यशराज उर्फ लड्ड्या शेडगे (रा. पर्वती), प्रणव ढोबळे (रा. कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पुण्यातील व्यावसायिकाला ३ कोटी ८० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी  

एरंडवणे भागातील रेस्टाॅरंट आणि बारमध्ये १७ नोव्हेंबरला मध्यरात्री एकच्या सुमारास धक्का लागल्याने झाल्याने वादातून चौघा आरोपींनी ओंकार कदम आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना मारहाण केली होती. याप्रकरणी प्रचीत काकडे, संतोष कांबळे, राज सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर १९ नोव्हेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास रेस्टाॅरंटमध्ये पाच जण शिरले. व्यवस्थापकाला धमकावून गल्ल्यातील २० हजारांची रोकड लुटली होती. उपाहारृहातील मारहाण आणि रोकड लूट प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलिसांकडून याप्रकरणी तपास करण्यात येत होता. पोलिसांनी तपास करुन चैाघा आरोपींसह त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अजय भोसले आणि पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×