Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

दुुरस्तीसाठी दिलेली मोटार घेऊन गॅरेज चालक पसार

दुुरस्तीसाठी दिलेली मोटार घेऊन गॅरेज चालक पसार

गॅरेज चालकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – दुरुस्तीसाठी दिलेली १० लाखांची मोटार घेऊन गॅरेज चालक पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी गॅरेज चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत वकिलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गॅरेज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानराधा प्रकरणातील पसार संचालक अर्चना कुटे यांच्यासह दोघींना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वकिलांच्या मित्राने त्यांना मोटार वापरण्यासाठी दिली होती. न्यायालयात ये-जा करण्यासाठी ते मोटार वापरत होते. आरोपी गॅरेज चालक त्यांच्या ओळखीचा आहे. हांडेवाडी परिसरात गॅरेज आहे. वकिलाने मोटार दुरुस्तीसाठी दिल्यानंतर गॅरेज चालकाने मोटार दुरुस्तीसाठी ४० हजार रुपये खर्च येईल. मोटारीचे सुटे भाग बाहेरून मागवावे लागतील, असे सांगितले. मोटार दुरुस्तीसाठी वेळ लागणार असून, दोन महिन्यात मोटार दुरुस्त करुन देतो, असे गॅरेज चालकाने त्यांना सांगितले. जुलै महिन्यात त्यांनी मोटार दुरुस्तीसाठी दिली.

दोन महिन्यानंतर मोटार परत न केल्याने तक्रारदार वकील गॅरेज चालकाला भेटण्यासाठी गेले. तेव्हा गॅरेज बंद होते. त्यांनी चौकशी केली. तेव्हा गॅरेज चालकाने भाडेतत्त्वावर गॅरेजसाठी जागा घेलली होती. गॅरेज बंद करुन चालक निघून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करत आहेत.

जंगली महाराज रस्त्यावर दुचाकी चोरी

जंगली महाराज रस्त्यावरील श्री पाताळेश्वर मंदिरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोथरूड भागात राहायला आहे. १२ सप्टेंबर राेजी सकाळी दहाच्या सुमारास त्याने श्री पाताळेश्वर मंदिरासमोर दुचाकी लावली होती. दुचाकी चोरून चोरटा पसार झाला. चोरलेल्या दुचाकीची किंमत ५० हजार रुपये आहे, असे तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×