Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

भोर तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खून

हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुणे सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन; नसरापूर परिसरात बंद

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी राजगड पोलिसांनी एका ६५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी ग्रामस्थांनी माेर्चा काढून बंद पुकारला. भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर एका गोठ्यात अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने बालिकेला दगडाने ठेचून मारले. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पूरल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले.

लाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक – सविस्तर बातमी

नागरिकांनी पुणे- सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ’ग्रामस्थांची बाजू ऐकून आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन पोलीस अधीक्षक गिल यांनी दिले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर नसरापूर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला असून, शनिवारी सकाळी नसरापूर भागताील सर्व व्यवहार ग्रामस्थांनी बंद ठेवले. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. घटनेनंतर आमदार शंकर मांडेकर यांनी नसरापूरला भेट दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. न्यायवैद्यकीय पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. आरोपीविरुद्ध खून, बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×