Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

रोजगाराची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

रोजगाराची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

सासवड येथे सकाळी 10 वाजता, “प्लेसमेंट ड्राइव्ह”चे आयोजन

marathinews24.com

पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व लॉनिंग एज्युकेशन इन्स्टिट्युट कौशल्य विकास संस्था,सासवड यांच्या संयुक्‍त विद्यमाने १७ सप्टेंबरला लॉगिन पॅरामेडिकल कॉलेज आदित्य कॉम्प्लेक्स, हडको रोड, सासवड येथे सकाळी 10 वाजता, “प्लेसमेंट ड्राइव्ह”चे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – सविस्तर बातमी 

पुरंदर तालुका परिसरातील विविध उद्योजकांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ३०० पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्तपदे किमान १० वी,१२ वी, पदवीधर, मशिन ऑपरेटिंग, प्रोडक्श, क्लर्क, ओटी टेक्निशियन, मामा, मावशी, नर्स, ब्रदर्स, रेसेपनिस्ट, ट्रेनी अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांना ऑनलाइन Apply करणे आवश्यक आहे. नोकरीइच्छूक उमेदवारांनी विहीत दिनांकास प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी उपस्थित राहणे तसेच मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार बायोडाटा अर्जाच्या (Resume) प्रती सोबत आणणे गरजेचे आहे.

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष अथवा ०२० २६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सु. रा. वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×