गुंडाला पर्वती पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला पर्वती पोलिसांनी अटक केली. अजय भागवत घाडगे (वय २४, रा. कचरावत चाळ, शनीनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मनी लॉड्रींगची दाखविली भीती, जेष्ठाला २३ लाखांचा घातला गंडा – सविस्तर बातमी
पर्वती पोलिसांकडून गेल्या वर्षी घाडगेसह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतर घाडगे पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. गेले वर्षभर पोलिसांना तो गुंगारा देत होता. घाडगे हा त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी कात्रजमधील घरी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी महेश मंडलिक, सद्दाम शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, नानासाहेब खाडे, सूर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे यांनी ही कामगिरी केली.





















