Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

बालगृहातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी गोऱ्हे-तटकरे यांचा संभाजीनगर दौरा

बालगृहातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री अदिती तटकरे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा

छत्रपती संभाजीनगर – छावणी परिसरातील बालगृहातून नऊ मुली पळून गेल्याच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी (दि.१९) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भगवान बाबा बालिका आश्रम आणि सावली बालगृहास भेट देऊन मुलींच्या सुरक्षिततेची पाहणी केली तसेच त्यांच्या भावना, आवडीनिवडी आणि स्वप्नांविषयी संवाद साधला.

शिवचरित्राचा दीपस्तंभ हरपला; गजानन मेहेंदळेंच्या स्मृतींना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंची विनम्र श्रद्धांजली – सविस्तर बातमी

डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस सुधारात्मक पावले उचलण्याचे आदेश दिले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना‘अँटी-ट्रॅफिकिंग’ संदर्भातील माहिती संकलित करून आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत मुलींच्या सुरक्षेसाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

मुलींशी झालेल्या संवादादरम्यान डॉ. गोऱ्हे भावूक होत म्हणाल्या, “या मुलींना भेटून मला पुन्हा आई झाल्यासारखं वाटलं.” तर मंत्री तटकरे यांनी मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधला. काही मुलींनी आयएएस अधिकारी आणि आर्मीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली, तर काहींनी हस्तकला व कौशल्यविकास शिकण्याची मागणी केली. दोन्ही मान्यवरांनी त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देत त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. भेटीदरम्यान मुलींनी स्वतः बनवलेल्या पेंटिंग्स आणि क्राफ्ट्स दाखवले. मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. यावेळी मुलींनी महिला व बालविकास विभाग आयोजित बालमहोत्सवात वाचन, खेळ आणि सर्जनशील उपक्रमांचा समावेश वाढवण्याची मागणी केली.

या दौऱ्यात पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश पुंगळे, तसेच भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यातून प्रशासनाने मुलींच्या सुरक्षिततेबाबत अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पावले उचलावीत, तसेच मुलींच्या शिक्षण, कला आणि कौशल्यविकासाला प्रोत्साहन द्यावे, असा ठोस संदेश देण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×