Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदम

हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदम

पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा; उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

marathinews24.com

पुणे – महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळास भेट देऊन उत्पादन विभाग, सर्पालय, अश्व संवर्धन विभाग तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे – सविस्तर बातमी 

हाफकिन संस्थेची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करावा, अँटी-स्नेक व्हेनम सीरमचे उत्पादन वाढवावे तसेच राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार किट उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

हाफकिनच्या प्रलंबित निधीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, यासाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करण्यात येईल. संस्थेच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री कदम यांनी यावेळी दिली.

हाफकिन संस्थेकडे असलेली क्षमता, प्रदीर्घ अनुभव आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा यांचा प्रभावी वापर करून संस्थेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हुकरे, हाफकिनचे महाव्यवस्थापक धीवर, पिंपरी विभाग व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुरहे यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×