Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

श्रावण महोत्सवानिमित्त भव्य भजन स्पर्धा; महिलांच्या सहभागामुळे समाजाला नवा आत्मविश्वास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

द्वारका गार्डन, सुनिता नगर, वडगावशेरी येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन

marathinews24.com

पुणे – शिवसेना पुणे शहराच्या श्रावण महोत्सवानिमित्त द्वारका गार्डन, सुनिता नगर, वडगावशेरी येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संयोजन हेमंत बत्ते यांनी केले होते. मनोज अष्टेकर, गौरव कश्यप, उदय खांडके, प्रणव जोशी, दिनेश मुकुलकड, उत्तम नार्वेकर, श्रीकांत अप्पा कुलकर्णी, तुषार टाकळकर, रोहन साळवी आदींनी स्पर्धेचे आयोजन यशस्वी केले.

पहिल्या ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ स्पर्धांचा दिमाखदार समारोप – सविस्तर बातमी

या प्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आज श्रावणी सोमवार असून महिलांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम हा खरोखरच प्रेरणादायी आहे. महिलांच्या आवाजातली भक्ती ऐकताना संत जनाबाईंची आठवण होते. घरची जबाबदारी सांभाळून जेव्हा महिला अशा पवित्र कार्यात सहभागी होतात तेव्हा त्या संपूर्ण समाजाला नवा आत्मविश्वास देतात.”

तसेच महिलांच्या विकासाबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “महायुती सरकारने स्त्रियांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा दिल्यामुळे एसटी महामंडळ पुन्हा नफ्यात आले आहे. हजारो महिला एसटीने प्रवास करू लागल्याने एसटीच्या अर्थचक्राला गती मिळाली आहे. तसेच महिलांचे बचत गट, उद्योजकता यामुळे ग्रामीण व शहरी भागात आर्थिक चक्राला बळकटी मिळत आहे. महिलांना दिलेली कर्ज ९९% परतफेडीचा विक्रम करतात हीच त्यांची विश्वासार्हता आहे. महिलांनी घेतलेले कर्ज फक्त परतफेडच नव्हे तर अनेक ठिकाणी रोजगारनिर्मिती आणि कुटुंबाच्या स्थैर्याला बळ देण्यासाठीही मोलाचे ठरले आहे.”

या कार्यक्रमाला शिवसेना पुणे शहर संघटक आनंद गोयल, दिलीप देवकर, विनोद गलांडे, अनिता परदेशी, पद्मा शेळके, चेतन गलांडे, लक्ष्मण सावंत, धनंजय शिंदे, मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×