Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 वायुसेना पुणे येथे युवा संसदचे भव्य उद्घाटन

19 व 20 ऑगस्ट रोजी आयोजित युवा संसद कार्यक्रमाचे उद्घाटन

marathinews24.com

पुणे – केंद्रीय विद्यालय क्रमांक 2, एएफएस लोहगाव, पुणे येथे 19 व 20 ऑगस्ट रोजी आयोजित युवा संसद कार्यक्रमाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात झाले. या दोन दिवसीय कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्व क्षमता तसेच चिकित्सक चिंतन विकसित करणे हा आहे.

थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे भरपावसात धरणे आंदोलन – सविस्तर बातमी

उद्घाटन सत्राचे मुख्य अतिथी म्हणून श्री बापूसाहेब तुकाराम पठारे, माननीय आमदार (वडगाव शेरी विधानसभा क्षेत्र) उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना अनुशासन, जबाबदारी आणि सृजनशील विचारांनी लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.

विशिष्ट अतिथी म्हणून एअर कमोडोर सतबीर सिंग राय, एअर फोर्स स्टेशन, लोहगाव, पुणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले की अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढीस लागते.

या कार्यक्रमाला सौ. ए. पी. कच्छाप, सहाय्यक आयुक्त, केव्हीएस प्रादेशिक कार्यालय, मुंबई, श्री गर्ग, प्राचार्य, श्री भारत भूषण, प्राचार्य, केवी 2 एएफएस पुणे, श्री जगदीश चंद्र, उपप्राचार्य, तसेच श्री संजय कुमार पाटील, मुख्याध्यापक विशेषतः उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी संसद कार्यवाहीचे अनुकरण करत महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा व वादविवाद सादर केला. त्यांच्या या सादरीकरणातून खरी लोकशाही साकार झाली.

विद्यालयाचे प्राचार्य श्री भारत भूषण यांनी मुख्य अतिथी, विशिष्ट अतिथी व सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि आभार मानले. तसेच शिक्षक, सहकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध तयारीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

केवी क्रमांक 2 एएफएस पुणे येथील ही युवा संसद विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षणाचा व्यावहारिक अनुभव देत असून त्यांना जबाबदार नागरिक व भावी नेते घडविण्याच्या दिशेने प्रेरित करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×