Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

भांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव

दिगंबर जैन राष्ट्रसंतांचा दुर्मिळ समागम

marathinews24.com

पुणे – दौंड तालुक्यातील भांडगाव (यवत) येथील भक्तामर कलश तीर्थ येथे ११ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत ‘१००८ आदिजिन पंचमेरू मानस्तंभ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भक्तामर कलश तीर्थ परिसरात कलशाकार मंदिर, नवग्रह रत्नमय प्रतिमा, नद्यावर्तात १०८ आदिनाथ जिन प्रतिमा, भक्तामर ध्यान केंद्र व हीलिंग सेंटर, भक्तामर शास्त्र मानस्तंभ, महाद्वार, नवधा भक्ति भोजनालय, संत निवास व यात्रेकरू विश्रामालय, आरोग्य धाम (अस्पताल) तसेच पूजन साहित्य उपलब्ध करून देणारे भांडार अशा विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या महोत्सवाच्या यानिमित्ताने दिगंबर जैन राष्ट्रसंतांसह अनेक आचार्य, उपाध्याय, साधू-साध्वींचा दुर्मिळ संतसमागम येथे होणार आहे.

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन – सविस्तर बातमी

महोत्सवात १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता ‘भक्तामर ज्योतिष सम्मेलन’, १४ मार्च रोजी दुपारी १ वाजता ‘भक्तामर हीलर महोत्सव’ तसेच ४८००० मीटर हस्तलिखित भक्तामर वस्त्रांची विशेष झांकी सादर केली जाणार आहे. याशिवाय ‘जैन अल्पसंख्याक योजना – सरकारी योजना आणि संधी’ या विषयावर ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अमेरिकेतून पूर्वा सारंग शहा निर्मित भक्तामरवर चित्रफितीचे सादरीकरण होणार आहे.

या महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राजू शेट्टी, आमदार राहुल कुल यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आल्याची माहितीही यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी पत्रकार परिषदेत श्री. किशोर जिनदत्त शहा (चंदूकाका सराफ), डॉ. सारंग शरद कुमार शहा, श्रीमती सुजाता निरंजन शहा, ॲड. डॉ. स्वप्निल महावीर शहा (पुणे), श्री मिलिंद फडे आणि श्री. चेतन शहा (बारामती), वीरकुमार शहा, सुरेंद्र बडजात्या उपस्थित होते. विश्व संत डॉ. आचार्य श्री प्रणाम सागर जी गुरुदेव यांच्या प्रेरणेने तसेच दीक्षा गुरु पूज्य आचार्य श्री पुष्पदंत सागर जी यांच्या आशीर्वादाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×