Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५१ व्या अभ्यासवर्गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५१ व्या अभ्यासवर्गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना संसदीय प्रक्रियेची सर्वांगीण माहिती

marathinews24.com

नागपूर – राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. या वेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सचिव मेघना तळेकर तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

शासकीय योजनांचा लाभ घेत तरुणांनी उद्योजक व्हावे- हर्षवर्धन रानडे – सविस्तर बातमी 

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘लोक प्रतिनिधींची मतदारसंघाप्रती जबाबदारी आणि सभागृहाच्या माध्यमातून उपलब्ध असलेले संविधानिक व्यासपीठ’ या विषयावर मनोगत व्यक्त करताना लोकप्रतिनिधींनी जनतेशी असलेली नाळ जपण्याचे आणि संसदीय परंपरा दृढ करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षसंघटनेचे महत्त्व, पक्षशिस्त, संघटनात्मक भूमिका तसेच लोकशाहीसमोरील आव्हाने याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. संसदीय कामकाजाच्या रचनेपासून जबाबदार जनप्रतिनिधित्वापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक माहिती दिली.

अभ्यासवर्गात लोकशाही दृढ करण्यासाठी युवकांची भूमिका या मुद्द्यावरही विशेष भर देण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांनी मान्यवरांशी संवाद साधत संसदीय प्रक्रियेबाबत मार्गदर्शन घेतले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×