Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

लहानपणी वडिलांचे छत्र हरपले; पण जिद्दीच्या जोरावर ऋषिकेश नेवसे वकील झाले

कठोर परिश्रमातून मिळवली वकिली पदवी

marathinews24.com

सातारा – खंडाळा तालुक्यातील नायगाव (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव) या छोट्याशा गावातील ऋषिकेश सिंधू दीपक नेवसे यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर मुंबई विद्यापीठातून वकिलीची पदवी प्राप्त केली आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या ऋषिकेश यांचे संगोपन आईने प्रचंड कष्ट व मेहनत करून केले. शिक्षणाची गंगा लाभलेल्या या गावात ऋषिकेश यांनी शिक्षणाचा वारसा पुढे नेला आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देशात अव्वल-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला – सविस्तर बातमी

कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेत ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढे मुंबई विद्यापीठात वकिली शिक्षण घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अभ्यासात हुशार आणि मेहनती असल्यामुळे त्यांनी हे यश मिळवले.

त्यांच्या यशामध्ये कुटुंबाचा तसेच नायगाव गावातील समाजाचा मोठा वाटा असलेला दिसून येतो आई, आजी, चुलते, काकी, चुलत भाऊ-बहिणी यांच्या पाठिंब्यामुळेच शिक्षणाची वाट अधिक ऋषिकेश ला सोपी झाली. १८ वर्षांचा असतानाच घराबाहेर पडून आयुष्याचा संघर्ष सुरू केलेल्या ऋषिकेश यांनी आज परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यभूमी असलेल्या नायगाव गावातील या नव्या पिढीच्या ऋषिकेशच्या यशामुळे गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. गावातून शिक्षणाचा वारसा पुढे नेणारे ऋषिकेश नेवसे हे तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×