Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचा ३५० वा शहीदी दिन 

महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे मनिंदर पाल सिंग यांच्याकडून कौतुक

marathinews24.com

पुणे – ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस मनिंदर पाल सिंग यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे मनापासून अभिनंदन केले. आज पुणे ग्रँड टूरच्या तिसऱ्या टप्याचे सासवड ते बारामती हे १३७ किलोमीटरच्या स्पर्धेच्या वेळी ही प्रतिक्रिया दिल्ली.

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६; तिसऱ्या टप्प्यात कॅमेरून स्कॉटची सरशी – सविस्तर बातमी

नांदेडच्या पवित्र भूमीवर श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या विचारांचा आणि बलिदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. गुरु तेग बहादूरजींनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी दिलेले बलिदान सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे ग्रँड टूरचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, गुरु तेग बहादूरजींची विचारधारा ही समाजात एकता, बंधुभाव आणि धार्मिक सौहार्द टिकवण्याची प्रेरणा देणारी आहे. त्याच विचारधारेतून सायकलिंगच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील जनतेने तसेच प्रशासनाने गुरुजींच्या विचारांचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मनिंदर पाल सिंग यांनी आभार मानले. नांदेड येथे २४ तारखेला होणारा मुख्य सोहळा यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुरु तेग बहादूर साहेब यांनी दिलेला धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असून, तो खेळाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवला जात आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×