Breking News
डी.लिट.मुळे स्वयंपूर्ण गोवे उपक्रमाला बळ-मुख्यमंत्री प्रमोद सावंतकारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यूवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनफुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला

पती पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटले

बीडच्या केजमधील घटना

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – राज्य परिवहन मंडळातून आयुष्यभर प्रवाशांची सुरक्षित सेवा करून नुकतेच निवृत्त झालेले शिवाजी शिवराम भिसे यांना स्वतःच्याच तालुक्यात आपल्या पत्नी समोर लुटीचा सामना करावा लागला. बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास कळंब-सुर्डी रस्त्यावर दोन अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून भिसे दाम्पत्याकडील अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली आहे.

वादातून अल्पवयीनाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी

मिळालेल्या माहितीनुसार, सुर्डी (सोनेसांगावी) येथील मूळ रहिवासी असलेले शिवाजी भिसे हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून (चक २५ त ४६८३) कळंबहून गावी जात होते. सुर्डी फाटा ओलांडल्यानंतर काही अंतरावरच पाठीमागून आलेल्या एका दुचाकीने त्यांना ओव्हरटेक करून रस्ता अडवला. काही कळायच्या आतच दुचाकीवरील दोन हेल्मेटधारी तरुणांनी चाकू काढून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नीसमोरच भिसे यांच्या गळ्यातील २ तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि बोटातील ५ ग्रॅमची अंगठी असा एकूण अडीच लाखांचा ऐवज हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून गुन्हे अन्वेषण विभागही तपासात सामील झाला आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि चोरट्यांचे वर्णन मिळवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

१२ दिवसांतील दुसरी घटना; नागरिकांमध्ये दहशत विशेष म्हणजे, अवघ्या १२ दिवसांपूर्वीच अंबाजोगाईचे व्यापारी श्रीराम ढगे यांनाही अशाच पद्धतीने ४ लाख १० हजारांना लुटण्यात आले होते. या पहिल्या घटनेचा छडा लागण्यापूर्वीच दुसरी मोठी लूट झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×