Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

पुणे विमानतळावर २ कोटी २९ लाख रूपयांचा हायड्रोपोनीक गांजा पकडला

विमान प्रवाश्याला बेड्या; कस्टम विभागाच्‍या एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई करत एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी एका प्रवाशाला अटक करून तब्बल २ कोटी २९ लाख रुपये किंमतीचा हायड्रोपोनीक गांजा जप्त केला. बँकॉकहून परतणाऱ्या या प्रवाशाने चतुराईने बॅगमध्ये हे अमली पदार्थ लपवून आणला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा साठा विमानतळावरच हेरून पकडण्यात आला.

शाळकरी मुलाशी अश्लील कृत्य – विमानतळ पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी इंडिगोच्या 6E-1096 या विमानाने बँकॉकवरून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाबाबत शंका निर्माण झाली. एअर इंटेलिजन्स युनिटने नियमित तपासणीदरम्यान त्याचे वर्तन संशयास्पद आढळल्याने त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. त्याचे सामान उघडून सूक्ष्म तपासणी केल्यावर दोन बंद पिशव्यांमध्ये ठेवलेला २ हजार २९९ ग्रॅम उच्च प्रतीचा हायड्रोपोनीक गांजा आढळून आला. नियंत्रित, कृत्रिम शेती पद्धतीत तयार होणारा हा गांजा अत्यंत तीव्र आणि महागडा असल्याने अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात त्याला मोठी मागणी असल्‍याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ठ केले.

सापडलेल्या मालाबाबत प्रवाशाला विचारणा केली असता तो अडखळू लागला. पुढील चौकशीत अखेर त्याने हा माल स्वतःसोबत आणल्याची कबुली दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला अमली पदार्थ नियंत्रण आणि मन:प्रभावी द्रव्य कायदा, १९८५ अंतर्गत तात्काळ अटक केली. या प्रकरणात आणखी कोणते व्यक्ती किंवा टोळ्या संबंधित आहेत का, याचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हायड्रोपोनीक गांजाची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढती तस्करी पाहता विमानतळांवर गस्त आणि तपासणी आणखी कडक करण्यात येणार असल्याचेही सूचित करण्यात आले. एअर इंटेलिजन्स युनिट, पुणे आयुक्तालयाने केलेली ही कारवाई ही अलीकडील काळातील सर्वात महत्त्वपूर्ण कारवायांपैकी एक मानली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×