Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

सिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटक

सिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटक

गुन्हे शाखेचा छापा

marathinews24.com

पुणे – घरातून बेकायदा मद्य विक्रीचा प्रकार गुन्हे शाखेेच्या युनिट तीनच्या पथकाने उघडकीस आणला. सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द भागात एका घरावर छापा टाकून पोलिसांनी एक लाख २४ हजार रुपयांच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केला. बेकायदा मद्य विक्री प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.अंकितकुमार सूरजन बिंद (वय २०, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता), आदित्य राजू शिंदे (रा. शंकर मंदिराजवळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

डाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक सिंहगड रस्ता भागात गस्त घालत होते. त्या वेळी हिंगणे खुर्दमधील साईनगर परिसरात राहणाऱ्या अंकितकुमार बिंद याने घरात बेकायदा मद्याचा साठा करुन ठेवला असून, तो मद्याच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी पंढरीनाथ शिंदे आणि काटकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. बिंद याच्या घरातून एक लाख २४ हजार रुपयांच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. बिंद याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मित्र शिंदे याने मद्याच्या बाटल्या विक्रीसाठी दिल्याची माहिती दिली. दोघे बेकायदा मद्य विक्रीचा भागीदारीत व्यवसाय करत होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांना सिंहगड रस्ता पोलिसांच्या ताब्यात दिले.

अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गाैहर हसन, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक नानासाहेब कदम, पंढरीनाथ शिंदे, काटकर, राजेंद्र नलावडे, वाघमारे, किशोर शिंदे, लिम्हण, जगदाळे, बोंडरे, पुरुषोत्तम गुन्ला, झेंडे, राठोड यांनी ही कामागिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×